सिंधी सोशल संस्था तर्फे 172 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
अहमदनगर, दि. 09 - येथील सिंधी सोशल संस्थेतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप व प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. माऊली सभागृह सावेडी रोड येथे आयोजित कार्यक्रमात समाजातील 172 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष श्री.लालुशेठ मध्यान होते. तसेच श्री.अमरलाल तलरेजा, रामसेठ मेंघाणी श्री.सी.एल.मध्यान, कॅन्टोमेंट बोर्डचे मा.सदस्य सुरेश मेहतानी व विद्यमान सदस्या सौ.मीना मेहतानी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच याप्रसंगी मुले-मुली व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते इष्टदेव झुलेलाल देवजींच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन दीप प्रज्वलन करण्यात आले. नंतर राष्ट्रगीताचे समूह गायन झाले. नंतर संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल, बुके देवुन सत्कार केला. या प्रसंगी श्री.लालुशेठ मध्यान, सी.एल. मध्यान, दामोदर बठेजा आदींनी आपापले मनोगत व्यक्त करीत सिंधी सोशल संस्थेच्या अखंडपणे 14 वर्षापासून गुणवंताचा सत्कार करण्याच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्या इतर ही समाजोपयोगी कार्याबद्दल गौरवोद्गार काढले व संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित पालकांनीही मुलांनी केलेल्या श्रमाचे चीज झाल्याचे वाटते. जेव्हा अशी एक सामाजिक संस्था समाजातील गुणवंताचा दरवर्षी सत्कार करते, त्यांना मार्गदर्शन करते. ही गोष्ट मुलांसाठी व पालकांसाठी निश्चितच अभिमानास्पद बाब होय असे सांगितले.
जयराम खुबचंदानी यांनी प्रास्ताविकात सांगितले कि दरवर्षी संस्थेतर्फे इयत्ता 1 ली ते पदवी पर्यंत 80 टक्के गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. पण यंदाही टक्केवारी 85 टक़्के करण्यात आली असून सुद्धा 172 मुले पात्र ठरली यावरुन असे दिसते की मुलांनाही भावी काळाची कल्पना आली असेल की आजच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर नियमित अभ्यास व चांगली टक्केवारी मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी मुले प्रयत्नशिल असतात. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बन्सीलाल आसनाणी व महेश मध्यान यांनी केले. श्री.ठाकूर नवलाणी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सदस्य सुरेश हिरानंदाणी, भगवान मोत्याणी, जयराम गाबरा, रुप मोटवाणी, राजेश सचदेव, राणा किरतानी, किशोर खुबचंदानी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.