Breaking News

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पिक विम्याची प्रतिक्षा

बुलडाणा, दि. 15 - जिल्ह्यातील 86 हजार 330 शेतकर्‍यांना पिक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. पिक विमा कंपनीने या शेतकर्‍यांना रद्दबातल ठरविले असून त्यांना आता पिक विम्याचा लाभ मिळणार नाही. 
गेल्या 4 वर्षापासून निसर्गचक्राच्या बदलाने शेतीच्या उत्पन्नावर मोठा फरक झाला. उत्पन्न प्रतिवर्षी कमी कमी होत गेले. अशावेळी शेतक-यांना संरक्षण म्हणून पिक विमा उतरविला गेला. दुष्काळी स्थितीत पिकविम्याची मदत होईल या आशेने जिल्ह्यातील 3,63,246 शेतक-यांनी पिकविम्याची रक्कम भरुन विमा उतरविला. मागील वर्षी आणेवारीही 50 पैसेच्या आत आली. तर शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत केला असतांना जिल्ह्यातील तब्बल 86,330 शेतक-यांना या पिकविम्यातुन कंपनीने वगळल्याचे धक्कादायक चित्र आहे.
दुष्काळी परिस्थीती ओढवल्यास शेतक-यांना संरक्षण असावे म्हणून पिकविमा काढल्या जातो. अ‍ॅग्रीकल्चर इंसुरंन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई या कंपनीद्वारा जिल्ह्यात पिकविमा उतरविला गेला. ज्वारी, उडीद, मुग, तुर, सोयाबीन, तिळ, भुईमुग, कापूस या पिकांसाठी 60 टक्के जोखीमस्तर धरुन अल्पभुधारक शेतक-यांना 144 रुपया पासून 7 हजारा पर्यंत पिकनिहाय वेगवेगळी रक्कम भरुन विमा काढावा लागतो. सन 2015 मध्ये जिल्ह्यात 3 लाख 63 हजार 246 शेतक-यांनी  पिकविमा उतरविला यामध्ये 80 जोखीम स्तर असणा-या उस अडसाली, सुरु, खोडवा या पिकांचा समावेश होता. परंतु कंपनीनी केलेल्या सवें नुसार 86 हजार 338 शेतकरी या पिकविम्यातुन वगळले आहे. तर 2 लाख 76 हजार शेतक-यांना पिक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. पिकविमा उतरविण्यामध्ये सर्वाधीक पुढे चिखली तालुका राहीला असून या तालुक्यात 61 हजार शेतक-यांनी विमा काढला. त्या पाठोपाठ मेहकर तालुक्यात 60 हजार, सिंदखेडराजा तालुक्यात 44 हजार, खामगाव, बुलडाणा तालुक्यात 31 हजार शेतक-यांनी पिकविमा घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात उत्साहात शेतक-यांनी पिकविमा काढला आहे.
     मोताळा तालुक्यात 17 हजार शेतक-यांनी पिकविमा काढला. या परिसरात कपाशीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या तालुक्यातील केवळ 50      शेतकरी पिकविम्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. शेतक-यांनी विम्यापोटी 2 कोटी 80 लाख रुपये या तालुक्यातुन भरले प्रत्यक्षात तिच रक्कम कमी अधिक फरकाने कंपनीने परत केली असे म्हणावे लागते. 3 कोटी रुपये शेतक-यांना कपंनीकडून मिळाले आहे.
महसुल मंडळातील उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न आल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. असा निकष लावल्या जातो. उंबरठा उत्पन्न ठरविण्याची इंग्रजकालीन उंबरठा पध्दत आता हद्दपार होणे गरजेचे असतांना अदयापही तोच निकष लावल्या जातो हे विषेश!