समाजकारणात अग्रेसर असणार्यांना उमेदवारी देणार ः खा.जाधव
बुलडाणा, दि. 15 - आगामी नगरपालिका निवडणुकीत बुलडाणा नगर पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागावे. येत्या पालिका निवडणुकीत पालिका भगवी व्हायला हवी यासाठी त्या-त्या परीसरातील समाजकारणात सदैव अग्रेसर असणा-यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे खा.प्रतापराव जाधव यांनी स्थानिक विश्रामगृह येथे 11 जुलै रोजी आयोजीत कार्यकर्ता बैठकीत बोलतांना सांगितले.
सदर बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटिल, जालिंधर बुधवत, जिल्हा प्रमुख धिरज लिंगाडे, माजी आ.विजयराज शिंदे, जिल्हाप्रमुख महिला आघाडी सिंधुताई खेडेकर, शिवसेना नेते संजय गायकवाड, विठ्ठलराव येवले, संजय हाडे, अशोक इंगळे, अशोक गव्हाणे, प्रकाश देशलहरा आदी उपस्थित होते. येत्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेच्या वतीने पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी खा.प्रतापराव जाधव यांनी पदाधिका-यांना विविध सुचना दिल्या. निवडणुक संदर्भात मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, शिवसेनेचे धोरण हे 80 टक्के समाजकारण आणी 20 टक्के राजकारण असे आहे. त्यामुळे जनतेने तुमच्या उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली पाहिजे असा उमेदवार तयार होणे गरजेचे आहे. यासाठी आपआपला जनसंपर्क वाढवुन लोकोपयोगी कामे प्राधान्याने सोडवा, अशा सुचना कार्यकर्त्यांना दिल्या. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटिल म्हणाले की कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी आपल्या आक्रमकतेची धार कमी होऊ देऊ नये. येत्या निवडणुकी स्वबळावर लढवावयाच्या असून त्यासाठी जिल्हा शिवसेना शाखाची भुमिकाही ‘एकला चलोरे’ची असणार आहे. कार्यकर्त्यांनी कोणाची वाट न पाहता आतापासुनच मैदानात उतरावे, असे आवाहन केले. सदर बैठकीला महिला आघाडीचे शहर प्रमुख वैशालीताई ठाकरे,पाटिल ताई, कल्पना आव्हाड, भारतीतीई नगर सेवक, हेमंत खेडेकर, गजेंद्र दांदडे, मनोज यादव, गोवींदा खुमकर, आशिष खरात, रमेश गायकवाड तसेच बाळासाहेब धुड, गजानन मुठ्ठे, अनुप श्रीवास्तव, कृष्णा शिंदे, मोहन प-हाड, नारायण हेलगे, मानवतकर, सुमित गायकवाड यासह इतरांची उपस्थित होते.