Breaking News

कादवा नदीपात्रात अडकलेल्या तीघांना वाचविण्यात यश

लासलगाव/प्रतिनिधी। 15 - पालखेड धरणातून काल 25 हजार क्युसेस पाणी सोडल्याने कादवा नादिपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कुंदेवाडी ता निफाड येथील कादवा नदीपात्रात  गेलेल्या 3 लोक पुराच्या वेढ्यात अडकले आहेत मात्र याचवेळी दोन किशोरवयिन मुलांना गावातील पट्टीच्या पोहणार्‍यांनी  वाचवले  पालखेड धरणात पानी सोडल्याने कादवा नादिला पुर परिस्थिति निर्माण झाली  दुपारी 4 च्या सुमारास कुंदेवाड़ी येथे कादवा नादिपात्रात असलेल्या  जवळ  कुंदेवाड़ी येथील  केदू पवार, मांगीलाल माळी(30), पिंटू सूर्यवंशी हे दुपारी3 च्या दरम्यान दत्त मंदिराजवळील बंधार्यावरुनं चालत  गेले होते कादवा नादिपात्रात आले मात्र पालखेड धरणातून सोडलेल्या पाण्याची वाढत गेल्याने ते स्वताला वाचवण्यासाठी जवळ असलेल्या पक्क्या मातीच्या भरावावर हे तिघे जाऊंन उभे राहिले पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने निफाडचे प्रांत शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार भामरे हे घटनास्थळी गेले तिथे घटनेचे गाम्भीर्य पाहुन त्यानी पुरातील अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले  पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दत्त मंदिराजवळ असलेल्या तिघाना मात्र पट्टीचे पोहनारे असूनही त्यांच्याजवाळ जाण्याची हिम्मत होत नव्हती प्रसासनाने हेलिकॉप्टेरचि मागणी केलि आणि आपतकालीन पथक बोलावले होते रात्री उशिरापर्यंत त्याना वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरु होते.