राज्यमंत्री खोतकरांचे जल्लोशात स्वागत
जालना, दि. 12 - राज्यमंत्री मंडळात जालन्याचे आ. अर्जुन खोतकर यांची वस्त्रोद्योग, मस्त्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. शपथविधी सोहळ्यानंतर राज्यमंत्री खोतकर यांचे सोमवारी प्रथमच शहरात आगमन झाले. त्यांचे आगमन होताच औरंबादपासूनच ठिकठिकाणी उत्स्फूर्त व जल्लोषात स्वागत करण्यात आले. भर पावसातही स्वागत करण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
