जिल्ह्यात सततधार पाऊस
जालना, दि. 12 - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावत वरूणराजाने कृपा कायम ठेवली. तीन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने पिकांना जीवदान मिळण्यासोबतच जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाल्याचे चित्र आहे.तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. दिवस-रात्र पावसाची रिपरिप सुरूच होती. जालना तालुक्यासह सातही तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पिकांना जीवदान मिळाले असून, यंदा तरी समाधानकारक पीक येईल अशी आशा शेतर्यांना आहे. तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणार्या यावर्षी काहीअंशी दिलासा मिळण्याची आशा आहे. जून महिन्यात पाऊस पडला नसला तरी जुलै महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लागत आहे.