Breaking News

भाजपचे कमळ पक्षचिन्ह रद्द करण्यासाठी याचिका

कमळ हे राष्ट्रीय पुष्प असून त्याचा पक्षचिन्ह म्हणून गैरवापर  

मुंबई, दि. 07 - कायद्यातील बोधचिन्ह व नावांच्या कलमांचा भंग करणार आहे. कमळ हे पवित्र पुष्प असून भारतीय कला आणि पुराणातदेखील त्याचे विशेष महत्त्व आहे. तसेच हे फूल देवी लक्ष्मीचे प्रतिक असून संपत्ती, भरभराट आणि सुपीकतेचे दर्शक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कारणांसाठी कमळाचा वापर करण्यात येऊ नये, तसेच निवडणूक आयोगाने भाजपचे कमळ हे पक्षचिन्ह रद्द करावे, अशी याचिका गुरूवारी मुबंई उच्च न्यायालयात हेमंत पाटील यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाकडून 25 वर्षांपूर्वी भाजपला कमळ पक्षचिन्ह म्हणून देण्यात आले होते. त्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा व्यक्तीकडून कायदेशीर आक्षेप घेण्यात आला नव्हता. पुढील आठवड्यात याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. याशिवाय, निवडणूक आयोगाने भाजपला कमळ हे पक्षचिन्ह म्हणून बहाल करतानाच्या सर्व नोंदी सादर कराव्यात आणि हे पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी याचिकाकर्त्याकडून करण्यात आली आहे.
कमळ हे राष्ट्रीय पुष्प असू त्याचा राजकीय पक्षाचे चिन्ह म्हणून वापर करता कामा नये, असे या याचिकेत म्हटले आहे. भाजपकडून पक्षचिन्ह म्हणून होणारा कमळाचा वापर हा  यापूर्वी हेमंत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे अशाप्रकारची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळल्यामुळे हेमंत पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.