महापालिका निवडणूकीत तरुणांना संधी देणारे ः अजित पवार
पिंपरी, दि. 11 - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाकडून तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजित आणि उत्तम विकास झाला आहे. शहराचा आणखी विकास करण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे येणार्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादीकडून तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार असल्याची, माहिती माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.
काळभोरनगर, येथील राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते आशिष रॉय यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर शंकुतला धराडे, माजी आमदार अण्णा बनसोडे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, ’अ’ प्रभाग क्षेत्रिय अध्यक्ष निलेश पांढरकर, नगरसेविका वैशाली काळभोर, सुजाता टेकवडे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक जावेद शेख, प्रसाद शेट्टी, ’अ’ प्रभागाचे स्वीकृत सदस्य गिरीष कुटे उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, ’’पिंपरी-चिंचवड शहराचा राष्ट्रवादीने कायापालट केला आहे. विकास कामात कधी राजकारण केले नाही. पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना विचारुन शहराचा नियोजणपूर्वक विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या सुचनेप्रमाणे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीमध्ये यामागील काळातही तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली. तरुणांमध्ये कष्ठ करण्याची ताकद आहे’’.
काळभोरनगर येथील आशिष रॉय हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीने केलेली विकास कामे तळगाळातील जनतेपर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळे पक्षासाठी काम करुणार्या तरुणांना आगामी महापालिका निवडणूकीत संधी देण्यात येणार आहे. परिसरातील नागरिक आजवर पक्षाच्या उमेदाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. तसेच यापुढील काळातही मतदारांनी तरुण उमेदारांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन दादांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले.