कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा अपघाती मृत्यू
इंदापूर (प्रतिनिधी), दि. 11 - इंदापूरजवळ टोल नाक्यानजीक झालेल्या भीषण अपघातामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृष सभापती पंडीत वाघ आणि त्यांचे मित्र सुरेश बारवे जागीच ठार झाले आहेत. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप भोसले, अशोक खटके, सुरेश डरंगे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुपारी हा प्रकार घडला. हे सर्वजण टाटा इंडिगोने (एमएच13 बीक्यू 0053) पुण्यातील एका लग्न कार्यासाठी जात होते. एका मोटरसायकला चुकवण्याच्या प्रयत्न करत असताना त्यांची कार पलटली. कारने दोन वेळा पलटी घेतल्याने बारवे आणि वाघ यांना जबर दुखापत झाली, त्यात त्यांचे जागेवरच निधन झाले. तर भोसले, डरंगे आणि खटके यांना गंभीर दुखापत झाली आहे.
दोघांच्या निधनाची बातमी सोलापुरात वार्यासारखी पसरली असून त्यांच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे नेते होते. टेंभुर्णी गटाचे राष्ट्रवादीचे सदस्य होते. यापूर्वी त्यांनी माढा पंचायत समितीचे उपसभापतीपद भूषवले आहे.