Breaking News

श्री.मुंगसाजी महाराज पतसंस्थेने घेतलेली गरूडझेप अभिमानास्पदः आ.बोंद्रे

बुलडाणा, दि. 19 - श्री मुंगसाजी महाराज पंतसंस्था चिखलीच्या एकलारा येथील 7 व्या शाखेचा आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंदे्र यांच्या शुभहस्ते मोठया थाटात संपन्न झाला. शुभारंभ प्रसंगी एकलारा येथील शाखेच्या पहिल्या ठेवीदाराचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरांच्या स्वागत करण्यात आले. शुभारंभ प्रसंगी बोलतांना जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी पतसंस्थेतेचे कौतुक करतांना म्हणाले की मुंगसाजी महाराज पतसंस्थेने अल्पावधीतच घेतलेली गरूडझेप ही अभिमानास्पद असून याबददल संस्थेच्या संचालकांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असे सांगितले. यावेळी बाजार समिती सभापती विष्णू पाटील, ता
लुकाध्यक्ष डॉ. सत्येद्र भुसारी, पं. स. सभापती दयानंद खरात, जि.प.सदस्य अशोक पडघान, माजी सभापती संजय पांढरे, सरचिटणीस माणिकराव जाधव, नगरसेवक राणासुनिलकुमार सुरडकर, दिपक लहाने, सुधाकर जाधव, प्रकाश सपकाळ, माजी उपसभापती सि.राजा सुनिल जगताप, भारत म्हस्के,  सरपंच कमलाकर गवई, सरपंच एकलारा पाटीलबा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितले की, मुंगसाजी महाराज पतसंस्था हि विश्‍वासू पतसंस्था असल्यामुळेच मी आज याठीकाणी शुभारंभासाठी आलो आहे. पंतसंंस्था विकासापासून दुर असलेल्या शेतक-यांना कर्जरूपी मदत करून, विकासाच्या प्रवाहात आणून एकाप्रकारे समाजसेवेचे काम करत आहे. तसेच शेतक-यांनी परंपरातगत शेतीसह  आधूनिक शेतीचे प्रयोग करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ केली पाहिजे. यामुळे ग्रामीण विकासाला हातभार लागेल. असे सांगत एकलारा परिसरात जनसेवे साठी कार्यरत  झालेया या शाखेच्या सेवेचा शेतक-यांनी लाभ घेतला पाहिजे. तसेच निकसंकोचपणे ठेवी ठेवण्यासाठी संस्था विश्‍वासपात्र असून स्थानिक सल्लागार व परिसरातील शेतक-यांनी पतसंस्थेत ठेवी ठेवण्याबाबत आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक देशमाने यांनी संस्थेच्या प्रगतीपथावर बोलतांना सांगितले की, संस्था सुरवातीपासूनच नफयात असून संस्थेला आजपर्यत झालेल्या सर्व ऑडीट मध्ये अ वर्ग दर्जा मिळालेला आहे. संस्थेच्या ठेवी 25 कोटींच्या असून थकीत प्रमाण सुरूवातीपासून 5 टक्कयांपेक्षाही कमी राहिलेले आहे.
यावेळी संरपंच भोरसा-भोरसी समाधान आकाळ, स्थानिक सल्लागार प्रल्हाद आंभोरे, लक्ष्मण आंभोरे, शिवनारायण म्हस्के, संदिप म्हस्के, सतिष आंभोरे, गजानन वाघ, कृष्णा मुरकुटे, किशोर सोळंकी, राजेश गव्हले, सखाराम वैद्य, अतुल देशमुख, संजय काटोळे, बाळु काकडे, गजानन आंभोरे, सुदाम जाधव, शाम वाकदकर,पवार सर, गोपाल पानगोळे संस्थेचे उपाध्यक्ष मुरलीधर अग्रवाल, संचालक पुंडलीक बापु राउत, अनिलभाउ देशमुख, कन्हैयालाल भोजवानी, आनंदभाउ बोंद्रे, विजय जागृत, अभय तायडे, खालीदखॉ उस्मानखॉ, सौ. उषाताई चौरे, सौ. कावेरीताई भराड, सल्लागार मंडळ प्रल्हाद अंभोरे एकलारा, लक्ष्मण आंभोरे एकलारा, शिवनारायण म्हस्के पांढरदेव, डॉ. संदिप म्हस्के पांढरदेव, सतिष आंभोरे एकलारा, गजानन वाघ आमखेड, कृष्णा मुरकुटे भोरसा भोरसी, किशोर सोळंकी पाटोदा, राजेश गवले एकलारा, सखाराम वैद्य पाटोदा, अतुल देशमुख अंबाशी, संजय काटोळे खैरव, बाळु काकडे बोरगाव काकडे, यांच्यासह एकलारा परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन राम जाधव यांनी तर आभार प्रदर्शन शिवनारायण म्हस्के यांनी केले.