Breaking News

ज्ञानमंच बुलडाणातर्फे वृक्षारोपण

बुलडाणा (प्रतिनिधी), दि. 19 -  पर्यावरण संतुलीत असावे या दृष्टीने ज्ञानमंच बुलडाणा, नवदुर्गा महिला मंडळ एकता नगर व वर्धमान अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता एकता नगर येथील क्रिडांगणावर वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्ष सुरक्षेसाठी वर्धमान अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटीच्यावतीने ट्री गार्ड उपलब्ध करुन दिले. यावेळी ज्ञानमंच चे अध्यक्ष सुभाषचंद्र भंडारी, वर्धमान अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र जैन, प्रकाश देशलहरा, शिवचंद्र राजोरिया, विजयाताई राठी, बोंद्रे मॅडम, प्रा. भालके आदी उपस्थित होते. यावेळी भंडारी यांनी उपस्थितांना वृक्षरोपणाचे महत्व पटवून देत या वृक्षरोपणासाठी पुढाकार घेणार्यां परिसरातील युवकांचे भरभरुन कौतुक केले.
वृक्षरोपणाच्या यशस्वीतेसाठी सुजीत काटकर, मंगेश बिडकर, अक्षय राजपूत, आनंद राजपूत, अक्षय देशलहरा मित्र मंडळाने विशेष परिश्रम  घेतले.