शेतकर्यांनी फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा
सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) - बिगर कर्जदार, कर्जदार शेतकर्यांकरीता डाळिंब फळपिकाचा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि. 14 जुलै 2016 अशी असून सर्व डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी विहित मुदतीत विमा हप्ता भरुन या योजनेचा अधिकाधिक शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक यांनी केले आहे.
प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2016-17 मध्ये मृग बहारात राबविण्याकरीता लागू करण्यासाठी शासनाने 5 जुलै 2016 रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरु, व चिकू या फळपिकाचा यामध्ये समावेश आहे. ही योजना सन 2016-17 मध्ये राज्यातील 30 जिल्ह्यातील अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात राबविण्यात येत आहे. कोल्हापूर विभागातील सातारा-सांगली या जिल्ह्यातील डाळिंब फळपिकाकरीता अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात इफको टोकियो जनरल या कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
बिगर कर्जदार, कर्जदार शेतकर्यांकरीता डाळिंब फळपिकाचा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि. 14 जुलै 2016 अशी आहे. त्याकरीता सर्व डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी विहित मुदतीत विमा हप्ता भरुन योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. ज्या शेतकर्यांची डाळिंब फळपिका करीता कर्ज मर्यादा मंजूर असेल त्या सर्व शेतकर्यांचा विमा विहित मुदतीत करुन घेणे हे सर्व बँकांना अनिवार्य आहे.
या योजनेबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ुुु.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचा सांकेतांक 201607021815498001 असा आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालकांनी केले आहे.