अनेक वर्षानंतर नांदेडकरांनी अनुभवली झड!
नांदेड, दि. 10 - गेल्या काही वर्षांत पावसाची झड विस्मृतीत गेली आहे; परंतु शनिवारी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत जिल्हाभरात भीजपाऊस झाला. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचाही पाऊस झाला. शनिवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 11.04 मिलीमीटर पाऊस झाला असून या पावसाळ्यात आजवर 258.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पात 18.30 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे.
