Breaking News

पिण्याचे पाणी शेताच्या कडेला, टँकर चालकाची मनमानी

लातूर, दि. 22 - शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आसल्याने उपलब्ध स्त्रोतातून पाणी उपसा करून लातूर वासीयांची तहान भागविण्याचे प्रयत्न मनपा तसेच जिल्हा प्रशासना कडून सुरू आहे. परंतु, चालक-मालक मंडळी पिण्याचे पाणी शेतीच्या कडेला सोडून टँकर रिकामे करतात.
दरम्यान मिरज हून रेल्वेने पाणी आणले गेले. तसेच, बेलकुंड येथून 20 हजार लिटर क्षमता असलेल्या टँकरच्या माध्यमातून पाणी लातूरला दररोज आणले जात  आहे. मात्र, लातूर वासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही, अशी ओरड सुरू असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जे पाणी बेलकुंड प्रकल्पावरून उचलले  जात आहे, ते पाणी टँकर चालक-मालक मंडळी लातूरला न आणता वाटेत आसलेल्या शिवली गावानजीक शेतीच्या कडेला सोडून टँकर रिकामे करतात. आपला  डिजेल खर्च वाचवून फायदा करण्यासाठी नावाला फेर्या पूर्ण करीत आहेत.