रोष टाळण्यासाठी प्रा.शिंदेची पदभार घेण्यास टाळाटाळ ?
अहमदनगर, दि. 14 - पालकमंत्री प्रा.राम शिंदे हे आता दुहेरी अडचणीत सापडले आहे. नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांची मर्जी पाळायची की वरिष्ठांचा आदेश पाळायचा अशी दुहेरी अडचण त्यांच्या समोर निर्माण झाली असल्याने त्यांनी तुर्ततरी कोणतीही चर्च होत नसल्याने तसेच अनेक नेते दौर्यावर असल्याने वरिष्ठांचा रोष टाळण्यासाठी पदभार घेण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगत आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलै रोजी सुरु होत आहे. तसेच महसुल मंत्री खडसे यांच्यावरुन हे अधिवेशन गाजण्याची चिन्हे समोर दिसल्याने खडसे यांचा पत्ता आधिच बाजुला करण्यात आला आहे. तसेच अधिवेशन अगोदरच राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारात कुठे खुशी... तर कुठे गम... अशीच परस्थिती सध्या आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली जनसंधारणाचे कामे ही निश्चित महाराष्ट्राला दिशा देणारी आहेत. परंतु, हे खाते पंकजा मुंडे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी वडिलांना श्रंध्दाजली म्हणून जलयुक्त शिवाय योजनेच्या कामाला प्राधान्य देत महाराष्ट्र दुष्काळमुक्तीकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी होत चालला असता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पदाला धक्का लागतो की काय असाच काहीसा भ्रम झाल्याने पंकजा मुंडे यांच्याकडुन हे खाते काढुन ते प्रा.शिंदे यांना देण्यात आले आहे.
परंतु अद्यापही शिंदे यांनी या खात्याचा पदभार स्विकारलेला नाही यावरुन ना. पंकजा मुंडे परदेशातून परतल्यावरच पदभार घेणार, अशी भूमिका त्यांची असल्याचे चित्र दिसते. दरम्यान, एकीकडे ना. मुंडे यांची मर्जी सांभाळण्याच्या कसरतीमुळे त्यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज होतील की काय, याची काळजी प्रा.शिंदेंना सतावत आहे. त्यामुळे पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळूनही ना. शिंदे यांना त्यांचा आनंद साजरा करता येत नसल्याचे बोलले जात आहे.
धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना कॅबीनेट मंत्रीपद देवून प्रा.शिंदे यांच्या विरोधता ताकद देण्याचा एक प्रयत्न झाला असल्याचे यातुन पुढे येत आहे. तसेच खोतवाटप करताना शेतकरी चळवळीचे नेते सदाभाऊ खोत, धनगर समाजाचे नेते महादेव जानकर, तर केंद्रात आरपीआयचे रामदास आठवले यांना संधी दिली असली तरी मराठा समाजाचे नेते असलेले विनायक मेटे यांना डावलल्याने मेटे हे पुन्हा संघर्षाच्या पवित्र्यात असल्याचे कार्यकर्त्यांकडुन समजते.

