Breaking News

प्रा.डॉ.झावरे,अभिनेता दुधाडे यांना पारनेर भूषण पुरस्कार

अहमदनगर, दि. 14 -  पारनेर परिवार मित्र मंडळाच्या वतीने नुकताच पार पडलेल्या गुणगौरव साहेळ्यात ‘ पारनेर भुषण’ पुरस्कारबरोबरच अनेक गुणवंताना गौरविण्यात आले. अहमदनगरमध्ये हमाल पंचायत भवन येथे नुकताच हा सोहळा साजरा झाला. या मध्ये शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे न्यु आर्टस कॉलेजचे प्राचार्य डॉ.भास्काराव झावरे तसेच दुरदर्शन फेम मालिका गाजविणारे सिने अभिनेते श्री.हरिष दुधाडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ पारनेर भुषण’ पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. प्रतिकुल परिस्थितीत पारनेरकरांनी अनेक उच्च पदस्थ क्षेत्रे काबीज केलेली आहेत. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार दादाभाऊ कळमकर यांनी व्यक्त केले. 
पाररनेर मित्र परिवरातर्फे आयोजित केलेल्या गुणगौरव सोहळ्यात आय.ए.एस.मध्ये विशेष नैप्युन्य मिळविलेले श्री.दत्तात्रय शिंदे व श्री विष्णू औटी यांचाही सत्कार करण्यात आला. याचवेळी नगरसेवक दिलीपराव सातपुते, शिक्षक बँकेचे नुतन चेअरमन श्री.रावसाहेब रोहकले, स्वामी समर्थ बँकेचे चेअरमन अ‍ॅड. अशोकराव शेळके हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष श्री.अविनाश घुले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी ते पदवीपर्यंत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस कै.शंकरराव घुले यांना श्रद्धाजली वाहून परिवाराचे अध्यक्ष श्री.तारकराम झावरे यांचे उपस्थितीत सेनापती बापट ,राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्कि.दत्तात्रय शेळके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्री सदानंद सोनवणे यांनी तर अहवाल व गुणगौरव सोहळ्याचे वाचन सचिव प्रा.किसनराव पायमोडे यांनी केले.पारनेर भूषण’ मानपत्राचे  वाचन डॉ.दिलीप मोटे व प्रा.संजय दुधाडे यांनी केले. या प्रसंगी मा.दिलीपराव सातपुते डॉ.झावरे श्री. हरिष दुधाडे, श्री अविनाश घुले, राष्ट्रपती पारितोषक विजेते श्री.आबा लोंढे, रावसाहेब रोहकले, आय.ए.एस.अधिकारी श्री.दत्तात्रय शिंदे यांनी वैचारिक भाषणे झाली. यावेळी पारनेर तालुक्यातील अनेक मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती यात मा. नगरसेवक श्री.ज्ञानेदव पांडूळे, सौ.पवार, डॉ.अतूल नरसाळे, संपत दातीर, बंटी गुंजाळ, संजय खामकर, इजिं.प्रकाश देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री.सुरेश थोरात सर यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा.संजय दुधाडे यांनी केले.