Breaking News

सांगली जि. प. अध्यक्षपदी स्नेहल पाटील

सांगली, दि. 10 - राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ येळावीच्या सदस्या स्नेहल पाटील यांच्या गळ्यात घातलीच. ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी पाठवलेल्या पक्षनिरीक्षक सुरेश घुले व जिल्ह्याच्या निरीक्षक राजलक्ष्मी भोसले यांनी पक्षाच्या सदस्यांची मते आजमावल्यानंतर अध्यक्ष पदासाठी पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार स्नेहल अनिल पाटील यांचे शुकङ्घवारी नाव जाहीर केले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित जिल्हा परिषद सभेत ही निवड जाहीर केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात बैठक झाली. पक्षनिरीक्षकांच्या सूचनेनुसार सत्ताधारी गटाकडून स्नेहल पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. वैशाली नाईक व पपाली कचरे अनुमोदक होत्या. विरोधी काँगङ्घेसने अर्ज दाखल न करणेच पसंत केले. दुपारी तीन वाजता सभेस प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी अध्यक्षपदासाठी स्नेहल पाटील यांचा एकच अर्ज आल्याचे सांगत अध्यक्षपदी सौ. पाटील यांची निवड जाहीर केली. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सौ. पाटील यांना निवडीचे प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. त्यानंतर मुङ्घय कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रभारी अध्यक्ष रणजित पाटील, सभापती भाऊसाहेब पाटील, विरोधी पक्षनेते सुरेश मोहिते यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकार्‍यांनी सौ. पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर गुलालाची उधळण करीत फटाके वाजवले.
राष्ट्रवादी सदस्यांच्या बैठकीनंतर बोलताना पक्षनिरीक्षक सुरेश घुले म्हणाले, पक्षाचे नेते अजितदादा पवार व सुनील तटकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व सदस्यांची मते आजमावली. अध्यक्षपदावर सुशिक्षित, सर्वांना सोबत घेऊन जाणार्‍या, जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान करणार्‍यास संधी द्या. तोंडावर निवडणूक आहे. त्यासाठी राष्ट्रवादीची प्रतिमा उंचावेल, अशांनाच संधी द्या, अशी मागणी सदस्यांनी केल्याची माहिती घुले यांनी दिली. सदस्यांच्या मागणीनुसार सर्वानुमते नाव जाहीर केल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यापूर्वी ज्या-त्या तालुक्याचा निर्णय जो-तो तालुका घेत होता. आताच बदल करण्याचे कारण काय, यावर मात्र ठोस माहिती घुले देऊ शकले नाहीत.