Breaking News

संपतराव पवार यांना कृषि पुरस्कार

सांगली, दि. 10 - खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील क्रांती स्मृती वन प्रतिष्ठान व उगम फौंडेशनचे कार्यवाह भाई संपतराव पवार यांना मवसंतराव नाईक सामाईक कृषी पुरस्काराफने राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात रोख रक्कम 51 हजार रूपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अविनाश नाईक, डॉ. बकुल पटेल, निलय नाईक उपस्थित होते. 
वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अरुण बोंगीरवार म्हणाले की, भाई संपतराव पवार यांनी आटपाडी तालुक्यातील दुष्काळग्रस्त हिवतड गावामध्ये कमी पाणी नियोजनाद्वारे एक एकरामध्ये 200 डाळिंबाची झाडे लावून एक लाख रूपयांचे उत्पन्न क से घेता येईल याचे मॉडेल तयार करून ते या प्रकल्पाद्वारे राबविले आहे. सध्या आपल्या देशात पाणी नियोजनाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. अशावेळी पवार यांनी उगम फौंडेशनच्या माध्यमातून व लोकसहभागातून धरणसदृश बांधकाम करून अग्रणी नदीचे पुनरूज्जीवन करून दुष्काळी भागामध्ये फळबागांच्या यशस्वी लागवडीचा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. यावेळी मुश्ताफ अंतुले, बाबूराव पवार, बी. डी. कुंभार, शामराव पवार, संदेश पवार, कासकर उपस्थित होते.