Breaking News

भारताची दक्षिण कोरियावर 4-1 ने मात

चंडिगड, दि. 18 - भारत आणि दक्षिण कोरयामध्ये बलाढ्य समजल्या जाणार्‍या भारताने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत, आशिया /ओशनिया गटात भारतीय संघाने दक्षिण कोरियाविरुद्ध विजयाची औपचारिकता पूर्ण केली. एकेरीच्या दोन्ही आणि दुहेरीची एक लढत जिंकत भारतीय संघाने शनिवारीच विजय पक्का केला होता. रविवारच्या लढतींद्वारे निर्भेळ यश मिळवण्याची संधी भारताकडे होती. मात्र योंग क्यु लिमने भारताचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. भारताने ही लढत 4-1 अशी जिंकत जागतिक गटाच्या प्ले ऑफ लढतींसाठी पात्र होण्याचा मान मिळवला.