स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयाची तोडफोड
नाशिक, दि. 18 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने व्यापार्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपळगाव बसवंत व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयाची तोडफोड करत निषेध व्यक्त केला.
राज्यात सगळीकडे व्यापार्यांनी सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. मात्र, नाशिकच्या व्यापार्यांनी आपले परवाने परत केले, याच्या निषेधार्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. व्यापार्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत घोषणाबाजीही करण्यात आली.