Breaking News

रानभाजीतून विषबाधा ; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

रायगड, दि. 18 - सुधागड तालुक्यातील रासळ गावातील एकाच कटुंबातील पिता, पुत्र व माता अशा तीघांचा रानभाजी खाऊन विषबाधा झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला. अचानकपणे नकळत घडलेल्या या मृततांडवाने रासळ गावासह संपुर्ण खाडे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.
पावसाळ्यात मिळणार्?या रानभाज्या शरिरासाठी पोषक, सकस, पोष्टीक, चवदार, औषधी गुणकारी, संपुर्ण सेंद्रीय असल्याने, या रानभाज्या आहार म्हणून भोजनात सर्रास वापरल्या जातात. परंतू, अशा भाज्यांमध्ये एखादा विषारी तसेच रानभाजीचा सारखाच दिसणारा वनस्पती
चा प्रकार मिसळल्याने विषबाधा झाली असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की रासळ येथे राहणारे राजाराम श्रिपाद खाडे (90), तारामती राजाराम खाडे (75), अनिल राजाराम खाडे (55) या तिघांनी रानातून आणलेली कोळीची भाजी खाल्ली. त्यानंतर अचानकपणे अस्वस्थता जाणवू लागल्याने विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अलिबाग येथे शुक्रवारी तारामती खाडे यांचे निधन झाले. शिवाजी हॉस्पीटल ठाणे येथे उपचार घेत असलेले राजाराम खाडे यांचे मंगळवारी निधन झाले. तर, अनिल राजाराम खाडे यांना ज्युपीटर हॉस्पीटल ठाणे व शिवाजी हॉस्पीटल येथे उपचाराकरीता दाखल केले होते. अनिल खाडे यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपुर्ण सुधागड तालुका हळहळ व्यक्त होत आहे.