Breaking News

जिल्ह्यात सरकारी शाळेत 3 टक्के विद्यार्थी गळती

जळगाव, दि. 18 - चाळीसगाव,रावेर,चोपडा तालुक्यातुन अनेक कुटुंबिय कामानिमित्त स्थलांतर करीत असल्याने शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती झाली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात सरकारी शाळेत 3 टक्के विद्यार्थी गळती झाली आहे.
चाळीसगाव तालुक्यात सर्वाधीक 8.2 टक्के विद्यार्थी, यावल तालुक्यातुन 7.5 टक्के, रावेर, चाळीसगाव, बोदवड,जामनेर तालुक्यातुन सरासरी 5 टक्के गळतीचे प्रमाण आहे. अमळनेर,पारोळा,भुसावळ तालुक्यात शाळांमधून विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.