महाराष्ट्रात चांदा ते बांदा पावसाचा धुमाकूळ, पुण्यातही पावसाचा जोर, पाणीसाठ्यात वाढ
पुणे, दि. 12 - संपूर्ण महाराष्ट्रात चांदा ते बांदा पावसाने शनिवारी रात्रीपासून चांगलीच जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून पुण्यातही पावासाचा जोर चांगला पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, शहराला पाणी पुरवठा करणाक्षर्या धरणांमधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झालेली पाहण्यास मिळत आहे. पावसाचा असाच जोर पुढील चार ते पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
पवना धरणात 38.85 टक्के पाणीसाठा
पवना धरणाता गेल्या 24 तासात 69 मिमी पावसाची नोंद झाली असून धरणातील 1 जूनपासून आत्तापर्यंत 828 मिमी पावासाची नोंद करण्यात आली आहे. सतत कोसळणार्या या पावसामुळे धरणात आजअखेर 38.85 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर गेल्या 24 तासात धरणातील पाणीसाठ्यात 5.75 टक्क्यांनी वाढ झाली असून गेल्या दहा दिवसात पाणीसाठ्यात 28.85 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या वरसगाव, टेमघर, पानशेत, खडकवासला, या पाणलोट क्षेत्रातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून येथील पाणी साठ्यातही चांगली वाढ झाली आहे.
राज्यात सर्वदूर पावसाचा धुमाकूळ
पुण्यापाठोपाठ पावसाने राज्यातही जोरदार हजेरी लावली असून नाशिकमध्ये गेले सहा दिवस पडत असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नाशिकमध्ये नऊ तासात तब्बल 991 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून कोसळणार्या या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रामकुंडवरचा रामसेतू पूलही पाण्याखाली गेला. बाणगंगा नदीलाही पूर आला असून दारणा, भावली, कश्यपी, धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पावसाने विदर्भ, कोकण, मराठवाडा या भागातही धुमाकूळ घातला आहे.
कोल्हापुरात पंचगेगेने धोक्याची पातळी ओलांडली
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर सलग तिसर्या दिवशी पाऊस कोसळत असल्याने आत्तापर्यंत झालेल्या पावसाने 32 बंधारे पाण्याखाली गेले आहे, तर पंचगंगा नदीच्या पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे.