शाळकरी मुलांकडून वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा
पारनेर (प्रतिनिधी) । 05 - पारनेर तालुक्यात दि.1 जुलै हा कृषीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक गाव, शाळांमध्ये व वनक्षेत्रात हजारो झाडांची लागवड करण्यात आली तसेच शांळामधून हजारो विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा कृषी दिनानिमित्त केली. दि. 1 जुलै हा दिवस कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यावर्षी केंद्र व राज्य शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यासाठी सर्वच यंत्रणांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पा
रनेर तालुक्यात प्रशासनाने 18 हजार, वीस झाडांची लागवड केली आहे. प्रशासनाबरोबर सामाजिक संस्था ,मडळे,खासगी शाळा आदींनीही या मोहिमेत सहभाग नोंदवून हजारो वृक्षांची लागवड केली. समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे शाळकरी मुलांसोबत डोंगर उतारावर वृक्षारोपण केले तर तालुक्याचे आमदार विजय औटी यांनी प्रांताधिकारी संतोष भोर व तहसीलदार भरती सागरे यांच्यासोबत पारनेर तहसील कार्यालय परिसरात झाडे लावली. पारनेर महाविद्यालयात राहुल झावरे,प्राचार्य आर.के. आहेर,प्रशांत झावरे,गौरव भालेकर गणोश कावरे यांच्या हस्ते, नगरपंचायत्तर्फे सागरदास मंदिर परिसर व दशक्रिया घाट परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नगराध्यक्षा सी.ए. औटी ,उपनगराध्यक्ष अनिकेत औटी,नगरसेवक किसान गंधाडे ,नंदकुमार देशमुख,सौ. सुरेख भालेकर,नंदू औटी, चंद्रकांत चेडे,गणपत आंबुले,दत्तात्रय कुलट व मुख्यधिकारी रावसाहेब खेडकर यांनी वृक्षारोपण केले. किसान इंटरनेशनल स्कूलमध्ये संस्थापक चंद्रकांत चेडे,अर्जुन भालेकर,बबन शेख आदींनी वृक्षारोपण केले. शिक्षक बँकेत अध्यक्ष रावसाहेब रोहकले ,संजय वाघमारे,शंकर नागरे,संजय देशमुख यांनी झाडे लावली. याचबरोबर अळकुटी परिसरात रामदास भोसले,डॉ. भास्कर शिरोळे,खा. दिलीप गांधी यांनी तर पोलिस स्टेशन परिसरात पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर,नगरसेवक विशाल शिंदे,शिरीष शेटिया अशोक डोंगरे यांनी तर वडगाव सावताळचे सरपंच छाया शिंदे, धनंजय शिंदे, गारखिंडी येथे दादू चौधरी,विश्वनाथ झिंजाड,गरगुंडी येथे सर्व ग्रामस्थ. भाळवणी येथे सरपंच बबन नेमते,बाबाजी तरटे,संभाजी रोहकले आदींनी वृक्षारोपण केले.