Breaking News

श्री क्षेत्र सिध्देश्‍वर दत्त देवस्थान दिंडीचे स्वागत

अहमदनगर, दि. 12 - तालूक्यातील हळगांव येथील श्री क्षेत्र सिध्देश्‍वर दत्त देवस्थानच्या पायी दिंडी पंढरपुरकडे मार्गस्त झाली. या दिंडीचे स्वागत हळगांव ग्रामस्थांच्यावतीने करण्याता आले. या दिंडीचे व देवस्थानचे प्रमुख हभप दादा महाराज रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी दरवर्षी निघत आहे. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे दिंडीमध्ये सहभागी होणारे वारकरी कुठलेही व्यसन करत नाहीत. 
दिंडीची सुुरुवात श्री क्षेत्र सिध्देश्‍वरी दत्त देवस्थान येथॅन झाली. यावेळी पादुका पुजन व हरिनामाचा जयजयकार करत दिंडी निघाली. या दिंडीचा पहिला मुक्काम पोथरे, दुसरा मुक्काम जेऊर, ता करमाळा तिसरा मुक्काम कंधर चौथ्या मुक्काम परिते बाबरवस्ती पाचवा मुक्काम भोसे, सहावा व
सातवा पंढरपूर अशा प्रकारे दिंडी या कार्गावरुन जाणार आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये किर्तनकार हभप अंकुश महाराज रणखांबे, हभप शेळके महाराज, हभप प्रल्हाद महाराज वाईकर, जिल्हा सातारा, हभप खटके महाराज , हभप प्रा.कांबळे महाराज आदिची समावेश आहे.
दिंडीची सुरवात श्री क्षेत्र सिध्देशवर दत्त देंवस्थान येथून झाली. यावेळी पादुा पुजन व हरिनामाचा जयजयकार करत दिंडी निघाली. या दिंडीचा पहिला मुक्काम पोंथरे येथे आहे. यंदा यादिंडीत बाल वारकरी सहभागी होणार आहेत.