अमरनाथ यात्रा : जळगावचे भाविक जम्मूकडे रवाना
जळगाव, दि. 12 - काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष्णव देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे.
