Breaking News

सुनिधी चौहानचे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण

मुबंई, दि. 07 - आपल्या सुरेल आवाजाने मोहित करणारी प्रसिध्द गायिका सुनिधी चौहान आता अभिनयाख्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. सुनिधी ‘प्लेइंग प्रिया’ या शॉर्टफिल्ममधून आपल्या अभिनयाची नवीन इनिंग सुरु करत आहे. ‘प्लेइंग प्रिया’च्या दिग्दर्शनाची धुरा ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आरिफ अली यांच्या हाती आहे. ही शॉर्टफिल्म तिच्या चाहत्यांना लवकरच डिजीटल मीडियावर पाहायला मिळणार असून ‘प्लेइंग प्रिया’ ही शहरात घडणारी फँटसी थ्रिलर आहे. खुद्द सुनिधीने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन याबाबत माहिती देण्यात
आली आहे.