राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार
पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, रणजित पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद?
शिवसेनेला दोन राज्यमंत्रीपदे देण्यात येणार ?
एकूण 8 ते 9 मंत्री घेणार शपथ .
मुंबई : 07 - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ आता राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित झाला असून, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद देणार की दोन राज्यमंत्रीपद देवून बोळवण करणार याकडे राजकीय वतुर्ळाचे लक्ष आहे. शिवाय शिवसेनाची नाराजी दूर न केल्यास या मंत्रिमंडळ विस्तारात जे मंत्रीपद मिळतील ते पदरात घेवून सेना शांत बसेल की या शपथविधीवरच बहिष्कार टाकेल हे उद्याच कळणार असले तरी सेनाची नाराजी भाजपाला सध्यातरी परवडणारी नसल्यामुळे भाजपा अनुकूल असेल. भाजपकडून पांडुरंग फुंडकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार अ राज्यात युती सरकार सत्तेवर आल्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळात घेण्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्या चर्चेला अखेर शुक्रवारी पूर्णविराम मिळणार असल्याचे समजते. या दोघांनाही राज्यमंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्याचबरोबर विनायक मेटे यांच्याही नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे.
सून, सध्या राज्यमंत्रीपदी कार्यरत असलेल्या राम शिंदे आणि रणजीत पाटील यांनाही कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यामध्ये 8 ते 9 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे, याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, त्यामधील काही नावे निश्चित समजली जात आहेत.
