Breaking News

श्रीलंकेकडून 16 भारतीय मच्छिमारांना अटक

रामेश्‍वरम, दि. 07 - सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोपावरून श्रीलंका नौदलाच्या जवानांनी गुरुवारी 16 भारतीय मच्छिमारांना अटक केली. मच्छिमार संघटनेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात तिसर्‍यांदा भारतीय मच्छिमारांना श्रीलंका नौदलाच्या जवानांनी अटक केली आहे. कच्चाथेवू येथे मच्छिमारी करत असताना यांना अटक करण्यात आली. 3 जुलैपासून आतापर्यंत श्रीलंकेकडून 44 मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. नौदलाच्या जवानांनी भारतीय मच्छिमारांना घेराव घालत त्यांच्याकडील 50 जाळ्या व काही बोटीही जप्त केल्या आहेत.