परभणीतून अटक नासेरबिन चाऊस बॉम्ब बनवण्याच्या तयारीत
औरंगाबाद, दि. 22 - आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन अटक झालेल्या परभणीच्या नासेरबिन चाऊसनं बॉम्ब बनवण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती आहे. एटीएसने औरंगाबाद कोर्टात याबाबत माहिती दिली आहे.नांदेड, औरंगाबाद, हैदराबाद हे नासेरबिन चाऊसचं टार्गेट असल्याचीही माहिती आहे. त्या बॉम्बचे छायाचित्र सिरीयातला दहशतवादी फारुकला पाठवण्यात आलं होते. चाऊसला हा बॉम्ब बनवण्यासाठी हवाला मार्फत पैसे मिळाले होते.