महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
औरंगाबाद, दि. 22 - महामार्गावर चाकुचा धाक दाखवून लुटणार्?या दरोडेखोराच्या टोळीतील तिघांना दरोडा प्रतिबंधक पथक, औरंगाबाद गामीण पोलिसांनी अटक केली. यावेळी एक दरोडेखोर पळून जाण्यास यशस्वी झाला. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की 18 जुलै रोजी जितेंद्र मनोहर पतंगे (रा. जिंतूर, जि. परभणी) हे पुणे येथून कंपनीचा माल खाली करून माल वाहतुकीचे आलेले रोख 50 हजार 500 रूपये घेऊन (एमएच 20, सी.टी. 8386) या ट्रकने येत होते. पाठीमागून एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी ट्रक अडवून त्यांना खाली उतरण्यास भाग पाडले होते. त्यानंतर ट्रकमध्ये चढून चाकुचा धाक दाखवून 50 हजार 500 रूपयांचा माल घेऊन पळ काढला होता.