Breaking News

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

नाशिक/प्रतिनिधी। 12 - धरणाच्या  पाणीसाठ्यात  लक्षणीय वाढ झाली आहे. गंगापूर धरणात 47 टकके तर दारणा धरणात 66 टक्के पाणीसाठा झाला आहे. पालखेडमध्ये 77 टक्के पाणीसाठा झाला असून 19 हजार 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दारणातून 9175 तर नांदुरमधमेश्‍वरमधून 35 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 
याशिवाय गोदावरी डावा व उजव्या कालव्यातून प्रत्येकी 150 क्युसेक्स पाणी सोडले आहे. पालखेड डाव्या कालव्यातून 600 क्युसेक्स पाणी सोडले आहे. त्याचा फायदा मनमाड, मनमाड
रेल्वे, येवला नगरपालिका आणि 38 गाव पाणी पुरवठा योजनेस होणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्प क्षमतेच्या 24 टक्के पाणीसाठा झाला आहे. नागरिकांनी पूर पाहण्यास न जाता गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जोरदार पावसामुळे रामकुंडावर धावपळ /पार्किग मधून गेल्या गाड्या वाहून
पंचवटी - नाशिकमध्ये पावसानि दमदार हजेरी लावली गोदामाई वोसडुन वाहु लागली बळीराजा सुखावला सायकाळ पर्यंत पुरस्तिथि निर्माण झाली होती.त्यामुळे गोदामाई लगत असलेली दुकाने यांची धावपळ उडाली व गाड्या वाहून गेल्या.
 दिनांक 9 जुलै 2016 दुपार पासून पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाल पर्यंत पाणी हे दूतोंडया मारुतीच्या छाती पर्यंत पोहचले होते.रामकुंड परिसरातील दुकांदाराची धावपळ उडाली होती.पार्किग मधील दुचाकी व चारचाकी  लावलेल्या होत्या त्या वाहून गेल्या त्यात 1 सीइफ्ट कार, 1 वैगन आर, अक्टिव्हा,होरो हौंडा, बजाज पल्टिना अश्या एकूण 8 गाड्या होत्या.
जिल्ह्यात सरासरी 126 मिमी पावसाची नोंद
नाशिक - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण 1899 मिमी पाऊस झाला असून त्याची सरासरी 126 मिमी आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यातील सरासरी पर्जन्यमान 154 मिमी आहे.  आतापर्यंत सरासरी 353 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून मागीलवर्षी याच कालावधीत 166 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
काल सर्वत्र झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पाणी आले आहे. गोदावरीत काल 22 हजार क्युसेक्सने प्रवाह सुरू होता.  इगतपुरी येथील तरंगपाडा पिंप्री येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 20 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस नाशिक तालुक्यात 61 टक्के,बागलाण 54 आणि सिन्नर तालुक्यात 51 टक्के झाला आहे. सर्वात कमी पावसाची नोंद मालेगाव येथे 22.5 आणि पेठ येथे 25.5 टक्के झाली आहे. जिल्ह्यात एकूण 32.87 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.