Breaking News

अनुसूचित जाती महामेळाव्याचे 31 जुलै रोजी आयोजन

पंचवटी/प्रतिनिधी। 12 - अनुसूचित जाती मोर्चा महामेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागरण मोहीम हाती घ्यावी व मेळावा यशस्वी करावा असे आवाहन शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केले. ते वसंतस्मृती येथे अनुसूचित जाती मोर्चाच्या 31 जुलै 2016 रोजी होणार्या महामेळाव्याच्या पूर्वतयारी बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागुल, शहर सरचिटणीस सुरेश पाटील, काशीनाथ शिलेदार, संभाजी मोरूस्कर, नगरसेवक कुणाल वाघ, प्रताप महरोलीया, मोर्चा अध्यक्ष  संजय गालफाडे, कैलास हांदगे, शहर उपाध्यक्षा सुजाता करजगीकर, दिलीप राऊत, बापु सपकाळे, उदय रत्नपारखी आदि उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणातून आ.बाळासाहेब सानप पुढे म्हणाले की अनुसूचित जातीसाठीही केंद्राच्या व राज्य शासनाच्या असंख्य योजना आहेत, अनुसूचित जाती मोर्चाच्या सहाय्याने कार्यकर्त्यांनी गरजू लोकांपर्यंत ह्या योजना पोहचावाव्या व त्यांना पुरेपूर योजनांची माहिती देऊन त्यांना लाभ मिळवून द्यावा असे सांगून  जुलै रोजी होणारा महामेळावा यशस्वी करावा असे त्यांनी सांगितले. यावेळी सुनिल बागुल यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनाची फक्त माहिती जनते पर्यंत न पोहचवता या योजनाचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
संभाजी मोरूस्कर यांनी जनतेच्या समस्या लोकप्रतिनिधी पर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचावाव्या व त्या समस्या सोडविण्यासाठी काम करावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. काशीनाथ शिलेदार यांनी 31 जुलै रोजी होणार्या मेळाव्याच्या नियोजनासाठी सर्वपरीने सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले तर सुरेश पाटील यांनी बैठकीच्या नियोजनावर भर देण्याचे आवाहन कार्यकर्त्यंना केले. मोर्चा अध्यक्ष संजय गालाफाडे यांनी शहर भर सर्व वस्त्यांमध्ये 100 हून अधिक बैठकीचे आयोजन केल्याची माहिती देऊन 5000 हून अधिक कार्यकर्ते या अनुसूचित जाती मोर्चाच्या महामेळाव्यात हजर राहतील असे सांगितले. यावेळी आजपर्यंत मोर्चाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती संजय गालाफाडे यांनी दिली. तसेच प्रताप महरोलीया, सुजाता करजगीकर, दिलीप राऊत, कुणाल वाघ यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली.
प्रास्ताविक व सुमसंचालन संजय गाळफाडे यांनी केले व आभार दशरथ गांगुर्डे यांनी मानले. या कार्यक्रमास अनुसूचित जाती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.