Breaking News

गोदावरी पात्रातुन जप्त केलेला जेसीबी अर्थपूर्णव्यवहारातून सोडला

गंगाखेड/प्रतिनिधी, दि. 12 -   गोदावरी पात्रात रेल्वे पुल परिसरात रेती उपसा करताना पोलीस कर्मचार्‍यांनी  जप्त केलेल्या जेसीबी व त्याचा मालकावर गुन्हा दाखल न करता आर्थिक तडजोडीतुन सोडण्यात आला. रेती तस्कर व पोलीस प्रशासनामध्य आर्कि मधुर संबध आसल्याचे उघड झाले आहे.  ठाण्यातुन सोडण्यात आलेला जेसीबी थेट गोदावरी पात्रात जावून पुन्हा रेती उपसा करु लागला. 
रेती तस्करांनी शहराजवळ आसलेल्या रेल्वे पुला जवळलील गोदावरी पात्रातुन रेती उपसा सुरु केल्याने रेल्वे पुलास धोका निर्माण झाला आहे. या पात्रातुन दररोज हजारो ब्रास रेती उपसामुळे पात्रात प्रचंड खोल खड्डे निर्माण झाले अ आहेत.  रेती तस्कर सकाळी सहा पासुनच या पात्रात रेती उपसा करीत आहेत. या मुळे 70 टक्के रेती उपसा झाल्याने पात्रात पाणी टिकुन ठेवण्याची क्षमता नष्ट झाल्याने गोदाकाठचा गावावर पाणी टंचाई  चे संकट कायम राहणार आहे. दिनांक 05 जुलै रोजी गोदावरी पात्रात रेल्वे पूल परस्थिती रेती उपसतांना जेसीबी मशनी आढळुन आला .त्याने पोलीस स्टेशनमध्ये आणुन लावला. जेबीसी जप्त केल्याने सदर मालकाने एका वजनदार नगरसेवकांच्या मदतीने पुन्हा जेसीबी नदी पात्रात रेती उपसा करण्यास लावली.
माजी नगरसेवकाची धावपळ
रेती तस्कराचा जेसीबी पोलीसांनी जप्त करताच जेसीबी मालका सोबत माजी नगरसेवक यांनी बरीच धावपळ केली. आपल्या नेत्याकडे जावून पोलीस अधिकारी यांच्यावर दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न सफल ठरला. आर्थिक तडजोडीत स्वतःची टक्केवारी पण वसुल केल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.