Breaking News

शिवसंग्रामच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमजद पठाण

जामखेड  (प्रतिनिधी) । 01 - तालुक्यातील नान्नज येथील अमजद पठाण यांची शिवसंग्राम संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे शिवसंग्राम चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांच्या आदेशा वरून अ.नगर जिल्हा संपर्क प्रमुख प्रभाकर कोलगंडे यांनी नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे पठाण यांचे अनेक वर्षा पासून मोठे सामाजिक काम करत आहे तालुक्यात जातीय सलोखा राखण्या साठी प्रत्येक वर्षी शिव जंयती उत्सव व ईद मिलन सारखे कार्यक्रम घेतात शिवचरित्रावर गाढा अभ्यास असून त्यांचे महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी
व्याख्यान केले आहेत.
 अमजद पठाण यांचे समाजातील सर्व स्थरातील लोकांशी जिव्हाळ्याचे चांगले संबध आहे त्यांचा सामाजिक कामाचा आढावा घेऊन जिल्हाउपाध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार मेटे यांनी त्यांच्या वर सोपवली आहे या निवडी बद्दल जिल्हा अध्यक्ष नितीन भापकर , शेवगाव तालुका अध्यक्ष नवनाथ ईसारवडे, जिल्हा सरचिटणीस मच्छिंद्र सुद्रीक, जामखेड ता.अध्यक्ष संतोष वाळुंजकर, भारतभूषण पतसंस्थेचे चेअरमन अल्लाउद्दीन शेख , मार्कट कमिटीचे माजी संचालक शहाजीराजे भोसले, नान्नज चे युवा नेते संरपच महेंद्र मोहळकर, माजी चेअरमन इन्नूस पठाण , पिंपरखेड ग्रा. सदस्य नजीर सय्यद, शहाजी गोरे, गोकूळ ढेपे, धनराज कुमटकर, धनराज भोसले, रसुल तांबोळी, समीर शेख, अमर चाऊस, दिपक भवाळ, मनोज कर्डिले , शिवाजी कराळे , यांनी त्याचे अभिंनदन केले
आ विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली जनहिताचे काम करत संघटना वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार असल्याचे आमजद पठाण यांनी सांगितले.