माजीमंत्र्यांची तहसीलदाराला शिवीगाळ
। निषेधासाठी कामकाज बंद करुन तहसील कर्मचार्यांचे आंदोनल ।
जामखेड (प्रतिनिधी) । 01 - माजी मंत्री सुरेश धस यांनी दुरध्वनी वरून जामखेडचे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांना आरवाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. व मी तूझ्यावर गुन्हा दाखल करीन असा दम दिला. या घटनेच्या निषेर्धात तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी तालुक्यातील तलाठी कर्मचारी यांनी दिवसभर कामकाज बंद ठेवुून निषेध व्यक्त केला.माजी महसुल राज्यमंत्री सुरेश धस यांनी पावने तीनच्या दरम्यान जामखेडचे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांना दुरूध्वीवरून विचारले की तू का नगर परिषदेमध्ये फोन केला यांना मी विचारले मी कधी फोन केला मला काही माहित नाही.कोणी फोन केला तरी देखील यावर धस म्हणाले की, निविदेसंदर्भात फोन केला होता. असे नगर परिषदेच्या कर्मचार्यांनी मला सांगितले. म्हणुन तहसिलदार बेल्हेकर यांना आरवाच भाषेत शिवीगाळ करून बीड स्टाईलमध्ये धस यांनी धमकी दिली. तसेच मी तुझ्यावर गून्हा दाखल करीन असा दम भरला. मागे जामखेड तालूक्यातील एक ग्रामसेवक बीड जिल्हयामध्ये नोकरी करतो. व जामखेड येथे नेता म्हणुन वावरतो त्यांची नगर परिषदेमध्ये सारखी लुडबुड असते. त्याच्या संदर्भात धस यांनी तो कर्मचारी माझा आहे. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नको. असे म्हणुन दमबाजी केली होती. धस यांनी दमबाजी करण्याची दुसरी घटना आहे. यावर तहसिलदार बेल्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या घटनेच्या निषेर्धात तहसिल कार्यालयातील कर्मचार्यांनी तालूक्यातील सर्व तलाठी कर्मचार्यांनी दिवसभर कामकाज बंद ठेवून घटनेचा निषेध केला. यावर या घटनेची माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात आली असुन जिल्हयातील सर्व तहसिलदार यांनी या घटनेचा निषेध केला असुन सर्व तहसिलदार काम बंद आंदोलन करणार आहेत. या घटनेची माहिती कळताच सर्व नागरिक तहसिल कार्यालयाकडे धाव घेवून घटनेची माहिती घेत होते. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांना धिर देत आम्ही तूुमच्या पाठीमागे आहोत. तूम्ही भिऊ नका तूमच्यासाठी आम्ही गाव बंद ठेवू अशी प्रकारच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या माजी मंत्री सुरेश धस यांनी तहलिसदार सुशिल बेल्हेकर यांना दिलेल्या धमकीच्या निषेर्धात कर्मचार्यांनी कामकाज बंद ठेवले.