Breaking News

भीषण अपघात तीन ठार

पुणे, दि. 18 - मुंबई महामार्गावर गाडी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात गाडी चालकासह तीनजणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
अमित श्रीकांत सुळेभालीवर (29), संतोष सुरेश वृंदावत (38) आणि शरद कृष्णराव पवार (35), अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेजण पुण्यातील रहिवासी होते.
मुंबईला एका मिटिंगसाठी हे तिघेजण गेले होते. आपली कामे संपून मुंबईवरु
न पुण्याकडे  परत येत असतांना कामशेतच्या बोगद्याजवळ गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गा़डी दुभाजकाला धडकून हा अपघात झाला.
अमित यांच्या मागे आई-वडिल एक बहिण, शरद यांच्या मागे आई-वडिल, भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी, तर संतोष यांच्या मागे आई-वडिल, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.