Breaking News

विम्बल्डन : सानिया-हिंगिस पराभूत

लंडन, दि. 08 - जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित भारतीय टेनिस्टार सानिया मिर्झा आणि स्विस गर्ल मार्टिना हिंगिस यांचे विम्बल्डन स्पर्धेतील  आव्हान संपुष्टात आले आहे. महिला दुहेरीच्या उपांत्यपुर्व फेरीत पाचव्या मानांकीत हंगेरीच्या तिमिया बाबोसा आणि कझाकिस्तानच्या यारोस्लावा श्‍वेदोवा या जोडीने सानिया- हिंगिस जोडीला 1 तास 9 मिनिटे चाललेल्या लढतीत 6-2 6-4  असे पराभूत केले.