पाटणा पायरेट्सचा सलग चौथा विजय
पाटणा, दि. 08 - प्रो कबड्डी लीगच्या पटणा लेगच्या पहिल्या दिवशी गुरुवारी झालेल्या सामन्यात पाटलीपुत्र क्रीडा संकुलातील मैदानात पाटणा पायरेट्सने प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बंगळुरू बुल्सवर 31-25 अशी बाजी मारली. गतविजेत्या पाटणा पायरेट्स संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहते मोठया प्रमाणावर गर्दी करतील अशी अपेक्षा होती. मात्र 1700 प्रेक्षकक्षमतेचे मैदान निम्मेच भरले होते.
दोन्ही संघांनी सुरुवातीला सामन्यात बचावात्मक पवित्र घेतला होता. बंगळुरूच्या विनोद कुमारने यशस्वी चढाई करत पहिला गुण मिळविला. यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांना टक्कर देत प्रत्येक गुणासाठी झुंजवले. पाटण्याने चढाईपटूंच्या बळावर 13 व्या मिनिटाला बंगळुरूवर लोण चढवला. मध्यंतराला पाटण्याने 15-12 अशी निसटती आघाडी घेतली.
मध्यंतरानंतर रोहित कुमारने बंगळुरूच्या आक्रमण आणि बचावाची धुरा खांद्यावर घेत पिछाडी भरून काढली. जवळपास आठ मिनिटे बाकी असताना बंगळुरूने 20-21 अशी वाटचाल केली. मात्र पाटण्याचे प्रतिनिधित्व करणार्या अब्लोफझल माघशडोलोने दोन जणांना बाद करत पाटण्याला 24-20 आघाडी मिळवून दिली. निर्णायक चढाईच्या वेळी बंगळुरूच्या रोहित कुमारला बाद करत पाटण्याने 26-20 अशी आगेकूच केली. पवन कुमारला माघारी धाडत पाटण्याने 28-21 असा वरचष्मा राखला. बंगळुरूचा बदली खेळाडू पवन कुमारला टिपत पाटण्याने विजयाचे पारडे आपल्या बाजूने राहील याची काळजी घेतली. शेवटच्या मिनिटाला पाटण्याने 5 सेकंदांच्या निर्धारित वेळेत चढाई न केल्याने बंगळुरूला एक गुण देण्यात आला. मात्र विजयासाठी तो पुरेसा नव्हता. पाटण्याने हा मुकाबला 31-25 असा जिंकला. पाटण्यातर्फे प्रदीप नरवालने चढायांमध्ये आठ गुण पटकावले. भरवशाच्या राजेश मोंडलने सहा गुणांची कमाई केली. कुलदीप सिंगने पकडी करताना सहा गुण मिळवत त्याला चांगली साथ दिली.