Breaking News

मंत्री गिरीश महाजन यांची परवाना नुतनीकरणासाठी आरटीओ कार्यालयात हजेरी

जळगाव, दि. 18 - वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाचा कोणताही बडेजाव न करता आरटीओ कार्यालयात जाऊन सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे खिडकीत उभे राहून ट्रॅक्टर, कार व दुचाकी या वाहन परवान्याचे नूतनीकरण केले. तर ट्रक चालविण्याचा परवाना घेतला. फोटो तसेच स्वाक्षरी स्कॅनिंगची पंधरा मिनिटात प्रक्रिया आटोपून ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या दालनात गेले.
प्रक्रिया आटोपल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास बर्‍हाटे यांनी त्यांचे स्वागत केले.
या वेळी महाजन यांनी संगणकीकृत लर्निंग लायसन्स चाचणीची माहिती घेतली, असता जळगावमध्ये ही सुविधा फक्त जिल्हा कार्यालयातच असल्याचे पाटील यांनी त्यांना सांगितले. त्यावर महाजन यांनी नाशिकच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यात तालुका व गˆामीण भागात होणार्‍या शिबिरांमध्ये सुरू करता येऊ शकते, अशी सूचना केली.