बीड जिल्ह्यातील 400 गावाकडे पावसाने फिरवली पाठ
बीड, दि. 18 - चार वर्षापासून पडत असलेल्या भयानक दुष्काळाने शेतकरी हैराण झाले आहेत. यावर्षी देखील बीड जिल्ह्यात पाऊसाळ्याचे दोन महिने पुर्ण होत आले तरी देखील पाऊसच पडतच नसल्यामुळे शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाचा फटका आष्टी तालुक्यातील शेतकर्यांना बसला आहे. मागील चार वर्षापासून पाऊस नाही. तर यंदाही सलग पाचव्या वर्षी देखील तीच परिस्थिती निर्माण झाली.
तालुक्यातील आष्टा, हरिनारायण, लोणी, शिराळ या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील 90 गावात पाऊसच पडत नसल्यामुळे शेतात पेरलेले उभे पीक आता जळुन जाऊ लागले आहे. तालुक्यातील नद्या प्रकल्प कोरठेठाक पडले आहेत. फक्त ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.