Breaking News

वंचितांना न्याय्य हक्क देण्याचीच शासनाची भूमिका- जयकुमार रावल

चाळीसगाव (जि. जळगाव), दि. 18 - समाजातील वंचित घटकांना त्यांचा न्याय्य हक्क दिलाच पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. त्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
चाळीसगाव येथे महाराणा प्रताप ट्रस्टच्या वतीने ‘राजपूत भामटापरदेशी भामटा समाज: वास्तव आणि संघर्ष’, या प्रा.सज्जनसिंग पवार लिखित पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी श्री. रावल बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार आर.ओ. पाटील हे होते. सोहळ्याला आमदार किशोर पाटील, माहिती आयुक्त पुणे- नाशिक रवींद्र जाधव, निवृत्त न्यायाधीश सी.जी. बैस, अ‍ॅड. अमरजित गिरासे, राज्य महि
ला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, उदेसिंग पवार, ठाणसिंग पाटील, दीपक पवार, जयपालसिंग सिसोदिया, गोकुळ राजपूत, दरबारसिंग गिरासे, भगतसिंग पाटील आदी उपस्थित होते.