स्त्री समानता आणि ग्लॅमरस!
हिंदी चिञपटसृष्टीतील आमिर खान हा अभिनेता सामाजिक संदेश देणार्या चित्रपटांचा नायक म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे. चित्रपटासारख्या ग्लँमरस क्षेत्रात असूनही सर्वसामान्य भारतीय समाजाला तो आपल्यातील एक वाटतो, हे त्याचे सर्वात मोठे यश मानायला हवे. अर्थात दोन वर्षापूर्वी त्याने सुरू केलेली सत्यमेव जयती ही छोट्या पडद्यावरिल मालिका त्याला सामान्य भरतीयांशी जोडून गेली. सर्वसामान्यांच्या जीवनात भेडसावणार्या प्रश्नांवर तो अशा तर्हेने भिडला कि त्यातून त्याने देशाचे अर्थकारण, समाजकारण, प्रशासन, न्यायव्यवस्था, व्यापारी क्षेञ, वैद्यकिय क्षेञ यासह सर्वच क्षेञातील खोटारडापणा त्याने चव्हाट्यावर आणले. अनेक प्रश्नांना हाताळताना त्यानेभारताचे जनजीवन ढवळून काढले. वैद्यकिय क्षेञाची कट प्रँक्टीस असो अथवा जेनेरिक औषधांवजी महागड्या औषधांची शिफारस करण्याचा प्रश्न असो किंवा स्ञी जनन्माची समस्या असो त्याने प्रत्येक प्रश्नाने सार्या भारताला कृतीशील होण्यास भाग पाडले. अर्थात आमिर खान केलेले हे कार्य आता किमान दोन वर्ष जुने झाले तर आता नेमका त्याचा विषय काढण्याचे कारण काय असा प्रश्न आपणास साहजिकच पडला असेल. आज त्याचा विषय घेवून लिहीण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्यात मुळत:च असणारी बंडखोरी. काल त्याने बॉलिवुडमध्ये पुरुषप्रधानता असल्याचे सांगत केवळ त्यामुळेच पुरुष अभिनेत्याला अधिक पैसा दिला जातो तर स्ञी अभिनेञीला तुलनेने खूपच कमी मानधन दिले जाते. तो एवढ्यावरच थांबला नाही तर बॉलिवुडमध्ये असणार्या पुरुषप्रधान व्यवस्थेचे ते द्योतक असल्याचेही त्याने स्पष्टपणे म्हटले आहे. वास्तविक हिंदी चिञपटसृष्टीत कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नसल्याचे जे सांगितले जाते त्यात काहीच तत्थ्य नाही, हे यावरुन स्पष्ट होते. जात, धर्म, प्रांत वर्ण, लिंग असा कोणताही भेदभाव तेथे होत नाही, अशी बढाईखोरी जे करत होते त्यांना आमिरने उघडे पाडले. माणूस ज्या क्षेञात काम करतो त्या क्षेञातील वैगुण्य दाखवण्याचे काम एखादा बंडखोरच करु शकतो. पाण्यात राहून माशाशी वैर न घेणार्या व्यवहारवाद्यांच्या या जगात आमिर खानने चिञपटसृष्टीतील या मानसिकतेवर ठेवलेले बोट हे पुरुष वर्चस्ववाद्यांना न पटणारे तर आहेच, पण तितकेच न पेलवणारेही आहे. हिंदी चिञपटसृष्टी अजूनही मसाला व सुमार चिञपटांसाठीच प्रसिध्द आहे. अन्यथा कलात्मक चिञपट म्हणून दर्जेदार चिञपटांना हिनवण्यात आले नसते. कसदार अभिनेत्यांचे मानधनही तसे सुमारच. पण स्त्री अभिनेञींना माञ त्यांच्या केवळ नावावर जरी चिञपट चालत असला तरी तंचे मानधन सुमारच आहे. ही बाब ग्लँमरसच्या क्षेञाची चर्चा करायची म्हणून केलेली नाही. परंतु जेष्ठ अभिनेञीचे मानधन देखील ज्युनियर अभिनेत्यापेक्षा कमी असणे ही बाब समाज संदेश देणार्या चिञपटांमध्ये देखील वास्तव आहे. आमिर खानने ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्याबद्दल तो पुन्हा एकदा धन्यवादास पाञ ठरला असे म्हणावे लागेल. अर्थात भारतीय समाजव्यवस्थेतील हे वास्तव केवळ शासन व्यवस्थेतच आपणास बदललेले दिसते. माञ शासकीय आस्थापनांचे वेगाने खाजगीकरण होत असल्यामुळे तेथेही आता फारशा अपेक्षा राहीलेल्या नाहीत. चिञपटसृष्टीत खोर्याने पैसा ओढला जातो असे जे आपण कतो ते केवळ पुरूष नटांच्या संदर्भातच. या क्षेञात एखादीच राखी सावंत असते जी आपल्याविरोधात होणार्या अन्यायाला वाचा फोडू शकते.पण अशा लढाऊ स्ञीयांना बदनाम करण्याचे तंञही बॉलिवुडला अवगत आहे. त्यामुळे त्यांचे गंभीर लढे देखील हसण्यावारी नेले जातात. पण आता आमिर सारख्या मिस्टर परफेक्सनिष्ट व्यक्तीमत्वाने चव्हाट्यावर आणल्यामुळे त्याकडे गांभिर्याने बघावेच लागेल. जेव्हा आमिर बोलतो तेव्हा समाजाला चुप्पी साधून चालत नाही. अर्थात चिञपटसृष्टीतील महिलांचा प्रश्न हा सामान्य स्ञीयांचा प्रश्न नाही असे काही जण म्हणतीलही. परंतु स्ञीयांचा प्रश्न हा सामान्य व असामान्य स्ञिया असा भेद करून मांडणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखेच आहे.
