Breaking News

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींसह एक दलाल अटकेत

पुणे, दि. 22 - पुण्याच्या कोथरुड भागातील भुसारी कॉलनीत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी एका दलालासह तीन मुलींना अटक केली आहे. रवी  शिवाजी तपासे असं दलालाचं नाव आहे. 
हा वेश्या व्यवसाय कल्याणी देशपांडे चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कल्याणी देशपांडे ही वेश्या व्यवसायातील नामचीन दलाल आहे.  आतापर्यंत पुण्यातील विविध पोलिस स्टेशनमधे तिच्यावर 22 गुन्हे नोंद आहेत. तर एकदा मो
क्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे.