Breaking News

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला?

नीस, दि. 15 - फ्रान्सच्या नीस शहरात गुरूवारी रात्री राष्ट्रीय दिन साजरा होत असताना प्रचंड गर्दीच्या ठिकाणी अचानक घुसलेल्या ट्रकने झालेल्या अपघातात  किमान 80 जण मृत्युमुखी पडले असून 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्याबाबत  अद्याप कुठलेही वृत्त नाही.
नीस शहरात फ्रेंच रिवेरा रिसॉर्टमध्ये राष्ट्रीय दिनाचे सेलिब्रेशन सुरू होते. यावेळी अचानक एक ट्रक लोकांना चिरडत गर्दीत घुसला. या अपघातात 80 जण  मृत्युमुखी पडले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ट्रकमधून गर्दीच्या दिशेने गोळ्या झाडण्याचा आवाज येत असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शिंनी  दिली. प्रशासनाने घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविल्या आहेत.