काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदतवाढ
ूनवी दिल्ली, दि. 15 - काळा पैसा जाहीर करण्याच्या योजनेला सरकारने पुढील वर्षी 30 सप्टेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच कर आणि दंडाची रक्कम तीन हप्त्यात भरता येईल.
उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेतील 25 टक्क्यांचा पहिला हप्ता नोव्हेंबर 2016 पर्यंत भरता येणार आहे. 30 मार्च 2017 पर्यंत दुसरा 25 टक्क्यांचा हप्ता भरता येईल. उर्वरित रक्कम 30 सप्टेंबर 2017पर्यंत भरावी लागेल, असे अर्थमंत्रालयाने जाहीर केले. तत्पूर्वी काळा पैसा जाहीर करण्याच्या योजनेतील रक्कम भरण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2016 होती.
काळा पैसाधारकांसमोर असलेल्या वास्तवातील अडचणींचा विचार करून महसूल खात्याने वेळापत्रकात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. शेअर्स, बाँड्स या स्वरूपातील असलेला पैसा तातडीने उपलब्ध नसल्याने कर आणि दंडाची रक्कम भरण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत खूपच कमी आहे, असे काळा पैसाधारकांनी सांगितले होते.