Breaking News

अँडी मरे विम्बल्डच्या फायनलमध्ये

लंडन, दि. 8 - जगातील दुसर्‍या मानांकित खेडाळू मरे याने तिसर्‍यांदा  विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील दुसर्‍या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित  अँडी मरे याने झेक रिपब्लिकच्या दहाव्या मानांकित टॉमस बेर्डिच याचा 6-3, 6-3, 6-3 असा सरळ सेटसमध्ये पराभव करीत अंतिम फेरी प्रवेश केला
अँडी मरे याने हा सामना 1 तास 57 मिनिटांत जिंकला. आता त्याची विजेतेपदाच्या लढतीसाठी कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी गाठ पडेल. अंतिम लढत  रविवारी खेळली जाईल.