थकबाकीदारांची नांवे फलकावर झळकल्याने 1॥ कोटी वसुली
सांगली, दि. 09 - महापालिकेच्या घरपट्टीची वर्षानुवर्षे असलेली थकबाकी वसुलीसाठी आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी कठोर पावले उचलली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी शहरातील चौका-चौकात थकबाकीदारांच्या नावांची यादीच डिजिटल फलकाव्दारे जाहीर करण्यात आली. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. आजअखेर घरपट्टीच्या थकबाकीपोटी एक कोटी 38 लाख रुपयांची वसुली झाली आहे. येत्या काही दिवसांत दहा लाखापुढील थकबाकीदारांची यादी जाहीर होणार
आहे. या थकबाकीदारांनीही पालिकेच्या वसुलीची धास्ती घेतली आहे.
महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या दोन्ही विभागाकडे जवळपास 50 कोटींची थकबाकी आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेताच उत्पन्नवाढीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला होता. त्यातून घरपट्टीच्या थकबाकीची वसुली करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घरपट्टी विभागाने 25 हजारावरील थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. यात सुमारे अकराशे ते बाराशे थकबाकीदार आहेत. या थकबाकीदारांकडे 19 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे.