जनता बँकेच्या निमंत्रीत संचालकपदी फिरोज पठाण यांच्यासह नितीन माने
सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) : सातारा येथील जनता सहकारी बँकेच्या निमंत्रीत संचालकपदी सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते फिरोज हबीबखान पठाण आणि रहिमतपूरचे नितीन माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक कालावधीत सत्ताधारी भागधारक पॅनेलच्या सोबत पठाण आणि माने यांनी काम केले असून त्यांच्या निवडीमुळे जल्लोष करण्यात आला.
जनता सहकारी बँकेवर भागधारक पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर निमंत्रित संचालक पदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. दरम्यान, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोज पठाण यांनी निवडणूक कालावधीत भागधारक पॅनेलसोबत राहून पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले होते. त्याचे फलीत म्हणून फिरोज पठाण यांना निमंत्रित संचालकपदी संधी देण्यात आली. दरम्यान, रहिमतपूर आणि विशेषत: नितीन माने हे नेहमीच भागधारक पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून निवडणूकीदरम्यान रहिमतपूरकरांनी बँकेत आम्हाला प्रतिनिधीत्व देण्यात यावे, अशी मागणी केली होती. नितीन माने यांची निवड निमंत्रित संचालक पदी करुन भागधारक पॅनेलने रहिमतपूरकरांची मागणी पुर्ण केली आहे. या निवडीबद्दल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भागधारक पॅनेलचे प्रमुख अॅड. मुकुंद सारडा, विनोद कुलकर्णी, बँकेच्या चेअरमन डॉ. चेतना माजगावकर, व्हाईस चेअरमन वजीर नदाफ यांच्यासह विविध मान्यवरांनी दोघांचे अभिनंदन केले.