सक्षम युवा फाऊंडेशन तर्फे अभिवादन सोहळा संपन्न
परभणी, दि. 19 - येथिल सक्षम युवा फाउंडेशनच्यावतिने कॉ.आण्णा भाऊ साठे यांच्या 47 व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन शुभम बॅन्ड पार्टी कारेगाव रोड येथे दि.18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले असुन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाई किर्तीकुमार बुरांडे भुषवले तर उदघाटक अजय गव्हाणे होते. प्रमुख वक्ते नितिन सावंत यांनी आपल्या भाषणात असे सांगीतले की, महा मानवांनी आमच्या तुमच्यासाठीच कार्य केले असुन अशिक्षित मानंसांनी देखील येथे क्रांती केली आहे. कॉ.अण्णाभाऊ साठे यांनी रशियन राजा स्टॅलीन यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला व मराठी कला आणी भाषा सातासमुद्रापार नेली, एक ऑगस्ट हाच खरा मराठी भाषादिन असला पाहिजे. या कार्यक्रमास डॉ.अनिल कांबळे,अजय गव्हाणे,माजी सभापती बापुराव वाघमारे,रवि लेंडे,मनपा सदस्य सचिन देशमुख अदि मान्यवर उपस्थित होते. या अभिवादन सोहळ्यास शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या प्र्रसंगी सचिन देशमुख,अजय गव्हाणे यांनी आपले विचार व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे विचारपिठावर सोपानमामा, परमेश्वर पारधे, बापुराव वाघमारे, माजी नगर सेवक चांदुराम बोराडे, भगवानराव साळवे, तसेच अन्य मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत समाजाला मार्गदर्शन केले. हा अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी आण्णा जोणगावकर,अमर हतिअंबिरे,प्रा.रविंद्र शिंदे,रवि उबाळे,सुनिल भांगे,नतिन डहाळे,रवि गवारे,गौतम उबाळे आदींनी परिश्रम घेतले.